D. El. Ed. Examination NOVEMBER, 2021FIRST YEAR (REVISED SYLLABUS )PROFICIENCY IN MARATHI(Part 1)डी. एल. एड. प्रथम वर्ष मराठी भाषा संप्रेषण व प्रभुत्व
D. El. Ed. Examination
NOVEMBER, 2021
FIRST YEAR
(REVISED SYLLABUS )
PROFICIENCY IN MARATHI
(Part 1)
Date 20/11/2021 Max. Marks: 40
प्र.1. (अ ) एका वाक्यात उत्तरे लिहा : (3)
1. संप्रेशनाचे दोन प्रकार कोणते?
उत्तर : भाषिक व अभाषिक हे दोन संप्रेषणाचे प्रकार आहेत.
2. वर्ण म्हणजे काय?
उत्तर : चिन्हाकीत केलेले मुलध्वनी म्हणजे वर्ण होय.
3. व्याकरण म्हणजे काय?
उत्तर : 'व्याकरण म्हणजे एखाद्या भाषेचे स्पष्ठीकरण करणारे शास्त्र' होय.
ब ) विसंगत घटक ओळखा?(2)
1. श्रवण,वाचन,भूमिकापालन, भाषण, लेखन
उत्तर: भूमिकापालन
2. झाडे, फुले, पाने, फळे, नद्या
उत्तर:नद्या
क ) वाक्यापूर्ती करा: (3)
1. भाष म्हणजे.........
उत्तर : भाष म्हणजे बोलणे.
2. उच्च्यारीत शब्दाद्वारे विचार वा भावना व्यक्त करण्याची क्रिया म्हणजे.........
उत्तर : उच्च्यारीत शब्दाद्वारे विचार वा भावना व्यक्त करण्याची क्रिया म्हणजे भाषण.
3. अपश्रवण म्हणजे.........
उत्तर : अपश्रवण म्हणजे चुकीचे ऐकणे.
प्र.2. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 60 ते 80 शब्दात लिहा : (8)
1. श्रावणासंबंधी पाळावायचे शिष्ठाचार लिहा.
उत्तर :श्रावणासंबंधी पाळावायचे शिष्ठाचार खालील प्रमाणे आहेत.(Text book page no. 31)
1. विध्यार्थ्यानी वर्गात ताठ बसावे, शांतता पाळावी व वर्गात सांगितले जाते ते लक्षपूर्वक ऐकावे.
2.बोलणाऱ्या व्यक्तीचे शांतपणे व सहनशीलतेने ऐकून घेणे.
3. आपल्या हावभावातून व अविर्भावातून बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर दिसावा.
4.बोलणाऱ्या व्यक्तीला योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे.
2. शब्दभांडार वाढविण्यासाठी दोन भाषिक खेळ तयार करा.
उत्तर : मुलांची शब्दाभांडार वाढण्यासाठी शिक्षकांनी प्रयन्तपूर्वक वाढावायची असते. खालील प्रकारे शब्दभांडार वाढविण्यासाठी दोन भाषिक खेळ:
1. संबंधित शब्द लिहा.
शाळा : शिक्षक, पुस्तके, वही, लेखणी,फळा इत्यादी.
2. शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून नवीन शब्द लिहा.
झाड : डमरू - रस्ता - तवा - वही - हिरा - राजा - जांभूळ इत्यादी
3. आवाज आणि भाषण यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर :आवाज आणि भाषण यांचा परस्पर संबंध आहे. दोहोतील फरक खालील प्रमाणे.(text bool page no. 18)
आवाज :1. आवाज जन्मजात असतो.
2. भाषेसह वापर कमी.
3. केवळ वाणीतून आशय व्यक्त करण्याकरिता उपयुक्त.
4. स्वरवर्णावर भर दिला जातो.
5. मानवी शरीरातील ध्वनी निर्माणशील यंत्रणे मार्फत उपयोग केला जातो.
भाषण :1. भाषण संपादित /शिकलेले असते.
2. वापर बहूतांशी भाषेच्या अंगानी.
3. उच्च्यारीत शब्दाद्वारे आशय व माहिती या दोहोंचे वहन करण्याकरिता उपयोगी.
4 स्वर, वर्ण व व्यंजनावर भर दिला जातो.
5. मानवी शरीरातील उच्च्यारण निर्माणशील यंत्रणे मार्फत उपयोग केला जातो.
4. स्वर म्हणजे काय? स्वरांचे प्रकार लिहा. (Text book page no. 23)
उत्तर : ज्या वर्णाचा उच्च्यार आपोआप होतॊ व तसाच तो स्पष्टहीं होतॊ, त्याला स्वर म्हणतात. ज्या वर्णाचा उच्च्यार करताना मुखातील अवयव एकमेकांना स्पर्श होत नाही अश्या ध्वनींना स्वर म्हणतात.
स्वरांचे तीन प्रकार आहेत.
1.हृस्व स्वर
2. दीर्घ स्वर
3. संयुक्त स्वर
प्र.3.खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 120 ते 160 शब्दात लिहा : (12)
1. शब्दासंपत्तीवर प्रभुत्व संपादन करण्यासाठी समानार्थी, विरुद्धार्थी प्रत्येकी 15 शब्दांची यादी तयार करा.
उत्तर : खालील प्रमाणे शब्दासंपत्तीवर प्रभुत्व संपादन करण्यासाठी समानार्थी, विरुद्धार्थी प्रत्येकी 15 शब्दांची यादी:
समानार्थी शब्द :
1. सत्त्य =खरे 2. नभ = आकाश 3.पाणी = जल 4.शुभ्र = धवल 5.सूर्य = रवी 6. अभिमान – गर्व 7. झाड = वृक्ष 8.डोळा = नयन 9. हात = कर 10. अभ्यास=सराव 11.अरण्य=वन, 12.अवघड =कठीण 13. अवकाश = अवधी 14.अतिथी=पाहुणा 15.अत्याचार – अन्याय
विरुद्धार्थी शब्द :
1. पांढरा × काळा 2.खरे × खोटे 3. अमृत × विष
4. न्याय × अन्याय 5. उंच × ठेंगणा 6. लहान × मोठा 7.दिवस × रात्र 8.अनादर=आदर 9.अनावश्यक = आवश्यक 10.अनुचित = उचित 11.अनुच्चारित = उच्चारित 12.अनेक = एक 13. अनेकता = एकता
14. अनेकवचन =एकवचन 15.अहित =हित
2. शब्दांच्या जाती किती ते सांगून विकारी जाती स्पष्ट करा.
उत्तर :ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तरच त्यास शब्द असे म्हणतात.मराठीत शब्दांच्या आठ जाती आहेत.
बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात.
शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो.
किंवा
शब्दांचे हृस्व दीर्घ उच्च्यारण विकासनाकरता तुह्मी कोणत्या तीन साधनांचा वापर कराल ते लिहा.
उत्तर : ह्या प्रक्रियेसाठी तीन साधने असतात:
श्रवण (Listening): सुरुवातीला शब्दाचे आवृत्ती सुनवणे, त्यातील हृस्व, दीर्घ, उच्च्यारण समजण्यासाठी.
नकारात्मक अनुभव (Negative Feedback): आपले उच्चारण सुनवताना नकारात्मक अनुभव करणे, त्याचे सुधारण्यासाठी.
अभ्यास (Practice): विशेषत: दीर्घ शब्दांचे उच्चारण साध्यांत अभ्यास करणे, नियमितपणे त्याचे सुधारण्यासाठी.
3. मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविल्यावर व्यक्तीच्या जीवनात कोणता परिणाम होतॊ ते स्पष्ट करा.
उत्तर :मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविल्याने व्यक्तीच्या जीवनात एकाधिक परिणामे होतात. प्रथमतः, सोयीस भाषेचे ज्ञान असलेले व्यक्ती अधिक भाषांतर संवाद साधू शकतो आणि सामाजिक संबंध तळेच जास्त बळीचे बनवू शकतो.
दुसरं, मराठीत प्रभुत्व मिळविल्याने स्थानिक सांस्कृतिक भावना वाढते, जिथे भाषांतर संबंधातील संबंधाची मूल्ये वाढतात. सोयीस, भाषेतील प्रभुत्वाने व्यक्तीला आत्म-विश्वास वाढवू शकतो आणि त्याचे विचार आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यात मदत करू शकते.
4. भाषणाची तयारी करताना तुह्मी कोणते मुद्दे विचारात घ्याल?
उत्तर : भाषण हे समूहाशी संवाद मनाला जातो आणि संवाद हा दोन व्यक्तीमधील आंतरक्रिया मानली जाते. उत्कृष्ट भाषण होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. मी भाषणाची तयारी करताना खालील मुद्दे विचारात घेईन.
1. जेमतेम आवाज : भाषण प्रभावी होण्यासाठी भाषणातील आवाज व आवाजातील तारतेचे परिणाम खास विचारात घेतले पाहिजे.
अ. एकसूरीपणा : भाषणात एकसूरीपणा न येणे.
ब. आवाजात चढ -उतार असणे : भाषण करताना योग्य चढ -उताराचा वापर होणे.
क. बलाघात व समाघात : योग्य त्या ठिकाणी योग्य आघात देणे म्हणजेच बलाघाताचा वापर करणे. बोलताना विशेष असा आघात न देता बोलणे म्हणजेच समाघताचा वापर करणे.
ड . गती नियंत्रित भाषण :भाषणाची योग्य गती ठेवणे.
2. भाषणात शुद्ध व स्पष्ट उच्चार यांचा वापर करणे.
3. बोलण्यात बोलण्याचे शिष्ठाचार पाळता येणे.
4. योग्य ठिकाणी विराम घेणे.
5. सहजरीत्या व प्रवाहिरित्या बोलणे
6. बोलताना योग्य क्रम राखणे
7. प्रसंगानुसार भाषेचा वापर करणे.
8 आत्मविश्वास पूर्वक बोलणे.
किंवा
संप्रेषण म्हणजे काय सांगून त्याचे फायदे लिहा.(textbook page no. 47)
उत्तर : प्रगत विज्ञान तंत्र ज्ञानामुळे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी, समूहाशी, गावाशी, राज्य, राष्ट्र वा परदेशाशी जोडली जाऊ लागली. एकमेकांशी संपर्क व संवाद वाढला. त्यातून संप्रेषण हीं संकल्पना विकसित झाली. दुतरफा निरोपाची देवाण -घेवाणीला, संपर्काला संप्रेषण असे म्हंटले जाते.
संप्रेषणाला इंग्रजीत Communication म्हणतात. प्रेषण म्हणजे पाठविणे.
वर्ग अध्यापणात प्रामुख्याने बोलणे -ऐकणे, दाखविणे -पाहणे, लिहिणे -वाचणे या मार्गाने संप्रेषण घडून येते.
संप्रेषनाचे फायदे खालील प्रमाणे.
1. बौद्धिकदृष्टीने मागे असलेल्या विध्यार्थ्यांना प्रभावी संप्रेषणामुळे आकलन होते.
2. शिक्षकाला आपले ज्ञान अध्ययावत ठेवता येते.
3. इंटरनेट व संगणकामूळे पुस्तकातील आशय क्षणात उपलब्ध होतॊ. त्यामुळे वेळ वाचतो.
4. दृक श्राव्य साधनांचा वापर केल्यामुळे संदेश प्रभाविरित्या पोहचविता येते.
5. विध्यार्थ्यांची अध्ययनात रुची वाढते.
6. ई -लर्निंग व संप्रेषण यात महत्वाचे संबंध दिसून येतो.
प्र. 4. प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 ते 250 शब्दात लिहा : (12)
1. 'स्वच्छता' या विषयावर औपचारिक संभाषण नमुना तयार करा. (शिक्षक आणि विध्यार्थी )
उत्तर : शिक्षक : शुभप्रभात मुलांनो!
विध्यार्थी : शुभप्रभात गुरुजी!
शिक्षक: विध्यार्थी मित्रांनो काल मी तुह्माला बोटांची नखें कापायला सांगितली होती. आज मी सर्वांची नखें पाहणार आहे. तर तयार आहात तुह्मी.
विद्यार्थी1 : होय गुरुजी.
विद्यार्थी2: नाही गुरुजी.
शिक्षक : का नाही?
विद्यार्थी 2: गुरुजी लक्षात नव्हते.
शिक्षक : मुलांनो आपल्याला दररोज ची कामे वेळेवर व नियमित करणे गरजेचे आहे.
जसे की दररोज वेळोवेळी साबणानी हाथ-पाय धुणे,दात घासणे,अंघोळ करणे,स्वच्छ कपडे घालणे, नखें कापणे इत्यादी.
विध्यार्थी 1: गुरुजी मी दररोज वेळोवेळी साबणानी हाथ-पाय धुतो,दात घासतो ,अंघोळ करतो ,स्वच्छ कपडे घालतो , नखें कापतो.
शिक्षक : खूप छान! शरीराची स्वच्छता आपल्या आरोग्या साठी खूप महत्वाची आहे. तुमचे आरोग्य ठीक असेल तर अभ्यासात मन लागेल.
विद्यार्थी 3: गुरुजी आता मी दररोज तुह्मी सांगितल्या प्रमाणे स्वतः शरीराची काळजी घेईन व अभ्यास करीन.
शिक्षक : खूप छान!
2. मराठी भाषेच्या कोणत्याही चार बोली भाषा उदाहरणासह स्पष्ट करा.
उत्तर : बोली हे व्यक्तींचे दैनंदिन व्यवहाराचे प्रमुख व स्वाभाविक साधन आहे. मराठीत वऱ्हाडी, अहिराणी, डांगी व कोंकणी या काही बोली भाषा आहेत.
1.वऱ्हाडी बोली : परंपरेने वऱ्हाड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात जी बोली बोलली जाते तिला वऱ्हाडी हे नाव प्राप्त झालेले आहे. वऱ्हाडी बोली नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, वणी, वाशीम, अकोला या प्रदेशात बोलली जाते.
उदा : 'हळ्या डांगीवर बसला हाये’ (कावळा फांदीवर बसला आहे).
2. अहिराणी बोली : अहिराणी किंवा खान्देशी या नावाने ओळखली जाते. खानदेश या प्रदेशावाचक नावानुसार ती 'खानदेशी' या नावाने ओळखळी जाते, तर खानदेशातील आभीर (अहिर ) लोकांची बोली म्हणून तिला अहिराणी हे नाव पडले आहे. धुळे हा अहिराणीचा केंद्र प्रदेश मानाला जातो.
उदा.'यक व्हता सल्डया.'(एक होता सरडा.)
3. डांगी बोली :डांग हे प्रदेशवाचक तसेच लोकवाचक नाव आहे. त्यामुळे तेथील बोलींचे डांगी हे नावही प्रदेशवाचक तसेच लोकवाचक आहे.
सध्याच्या गुजरात राज्यातील डांग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भौगोलिक प्रदेशात बोलली जाणारी डांगी मराठीच्या बोली समूहापैकी एक आहे.
उदा : वनौकरन (नौकरो), छौड़ो (लडको), छोड़ी-‘‘छोरीन‘‘,देना-देबो, लेना-लेबो
4. कोंकणी बोली : कोंकणी मराठीची बोली आहे की ती स्वतंत्र आहे यावरून सतत वाद आहे.
पश्चिम घाट आणि अरबी समुद्र याच्यामधील अरुंद डोंगराळ किनारपट्टीचा भूप्रदेश कोकण या नावाने ओळखले जाते.
कोकण या प्रदेशावरून तेथील बोलीला कोंकणी हे प्रादेशिक नाव पडलेले आहे. उदा.तुझे काम झाले आहे का?(तुगेले काम जाल्ल वे?)
किंवा
मराठी भाषेचे स्वरूप उदाहरणासह स्पष्ट करा.
उत्तर: मराठी भाषेचे स्वरूप विविध पातळ्यावर स्पष्ट करता येते.
1. द्विस्तरिय रचना : अ. मुलध्वनींचा मर्यादित साठा हा भाषेचा एक स्थर.
ब. मुलध्वनींच्या विविध रचना करून निर्माण केलेले अगणित अर्थ हा भाषेचा दुसरा स्थर.
2. निर्मितीशीलता : पूर्वी कधीही ऐकले नाही किंवा स्वतः उच्च्यारले नाही असे नवे वाक्य, नवी रचना, नवे भाषिक प्रयोग मराठीत सर्वाधिक केलेले आढळते.
3. अदलाबद्ल: एकमेकांच्या भाषिक रचना एकमेकांना समजणे आणि एकमेकांनी त्या पुह्ना वापरणे.
4. विशिष्ठाता : मानवी भाषेत फार मोठ्या प्रमाणात विशिष्ठाता असेते. मराठी भाषेत बऱ्याच वेळा नुसत्या कृतीतूनही संप्रेषण घडते.
5. स्थळकळतीतता : स्थळ काळा नुसार मराठी भाषा हीं बदलत राहते.
वरील प्रकारे मराठी भाषेचे स्वरूप स्पष्ट करता येते. मराठी भाषा हीं खूपच लवचिक आहे.
3. वर्णांचे प्रकार कोणते ते सांगून त्यांची उच्च्यारस्थाने स्पष्ट करा.
उत्तर : तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना तोंडातल्या ज्या भागांचा जास्त वापर होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला दिले गेले आहे.
१) कंठ्य
ज्या वर्णांचा उच्चार पडजिभेजवळ किंवा कंठातून होतो अशा वर्णांना कंठ्य वर्ण म्हणतात.
समाविष्ट असलेले स्वर -अ, आ
समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी – क, ख, ग, घ, ङ, ह,अ:
२) तालव्य
ज्या वर्णांचा उच्चार टाळूतून/तालूतून होतो अशा वर्णांना तालव्य वर्ण म्हणतात.
समाविष्ट असलेले स्वर -इ, ई
समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- च, छ, ज, झ, त्र,य,श
३) मूर्धन्य
ज्या वर्णांचा उच्चार कंठ व टाळूतून/तालूतून होतो अशा वर्णांना मूर्धन्य वर्ण म्हणतात.
समाविष्ट असलेले स्वर -ऋ
समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- ट, ठ, ड, ढ, ण, र, ष, ळ
४) दंत्य
ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ दातांना स्पर्श करते किंवा दातांचा आधार घेतला जातो अशा वर्णांना दंत्य वर्ण म्हणतात.
समाविष्ट असलेले स्वर -लृ
समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- त, थ, द, ध, न, ल, स
५) ओष्ठ्य
ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठांचा एकमेकांना स्पर्श होतो किंवा ओठांचा आधार घेतला जातो अशा वर्णांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात.
समाविष्ट असलेले स्वर -उ, ऊ
समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- प, फ, ब, भ, म
६) कंठतालव्य
ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि टाळू / तालू चा वापर करावा लागतो अशा वर्णांना कंठतालव्य वर्ण म्हणतात.
समाविष्ट असलेले स्वर – ए, ऐ
७) कंठौष्ठ्य
ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि ओठांचा वापर करावा लागतो अशा वर्णांना कंठौष्ठ्य वर्ण म्हणतात.
समाविष्ट असलेले स्वर – ओ, औ
८) दंतौष्ठ्य
ज्या वर्णांचा उच्चार करताना दात आणि ओठांचा वापर करावा लागतो अशा वर्णांना दंतौष्ठ्य वर्ण म्हणतात.
समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- व
९) दंततालव्य
ज्या वर्णांचा उच्चार करताना दात आणि टाळू / तालू चा वापर करावा लागतो अशा वर्णांना दंततालव्य वर्ण म्हणतात.
समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- च, छ, ज, झ
१०) नासिक्य
ज्या वर्णांचा उच्चार नाकातून होतो अशा वर्णांना नासिक्य वर्ण म्हणतात.
Comments
Post a Comment